शालेय पोषण आहार

नमस्कार मित्रांनो ;
             सदर एक्सल फाईल मध्ये पूर्ण एक वर्षाचे शालेय पोषण आहार पत्रके तयार  करण्यात आली आहेत.
जुन्या व नवीन नमुन्यात एकाच शिट मध्ये दोन्हींचा समावेश करण्यात आलेला आहे.फक्त दैनिक हजेरी व
शिजवलेला मेनूचा नंबर निवडला कि सर्व प्रपत्रे आपोआप तयार होतील.school details  मध्ये फक्त एप्रिल
महिन्यात आवश्यक माहिती भरा .इतर महिन्यात school details मध्ये फक्त धान्यादी माल प्राप्त झाल्यास भरावा.कोलम व रो लॉक करण्यात आलेले आहे.काही कारणास्तव आपणास अनलॉक करावयाचे असल्यास 
jk पासवर्ड  वापरावा.फक्त विनाकारण अनलॉक करून छेडछाड करू नये कारण सर्व रकाने एकमेकांना लिंक केलेले आहेत.फाईल व्यवस्थित काम करणार नाही.वर्षाच्या शेवटी वार्षिक ताळमेळ आपोआप तयार झालेला असेल.
सोफ्टवेअरची वैशिष्ट्ये
१. फक्त रोजची हजेरी व शिजवलेला आहाराचा मेनू नंबर टाकायचा आहे.
२.School Details पेज वरील माहिती एकदाच भरायची आहे.पुढे आपोआप अपडेट होईल.
३.एखादा माल महिनाभर पुरेल इतका stock नसेल तर आपणास School Details या पेज वर तशी सूचना     मिळेल.
४.तरीही तूम्ही मेनू शिजवला तर परत हजेरी पेज वर तो माल संपला आहे अशी सूचना मिळेल .
५.मसाल्याचे पदार्थ संपले तर खतवले जाणार नाहीत मात्र आहार शिजवला जाईल .
६.वर्षाअखेर ताळेबंद आपोआप तयार होईल.

फाईल साठी येथे क्लिक करा

फाईल कशी वापरावी याचा सविस्तर Video माझ्या TechGuruji या YouTube Channel वर पहावयास मिळेल.यथावकाश Video ची लिंक याच पेजवर उपलब्ध केली जाईल .

No comments:

Post a Comment